Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: केवायसी अपडेटच्या नावाखाली दीड लाखांचा गंडा

केवायसी अपडेटच्या नावाखाली दीड लाखांचा गंडा

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये पुन्हा एकदा सायबर चोरट्यांनी एका नोकरदाराला केवायसीच्या नावाखाली गंडा घातला. एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर लिंक पाठवून केवायसी अपडेट (Cyber Crime) करा व तुम्हाला आलेला ओटीपी मला सांगा. असे सांगत एकाला 1 लाख 39 हजार 900 रुपयांना गंडा घातला आहे. (Beed News Cyber Crime)

बीड मधील (Beed) शिवाजीनगर परिसरातील राहुल अच्यूतराव कदम असे गंडा घातलेल्या नोकरदार व्यक्तीचे नाव आहे. राहुल कदम हे पुणे येथे नोकरीला आहेत. 15 ऑगस्टला ते बीड येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एकाने फोन करून ‘तुम्हाला लिंक पाठवली आहे, त्या लिंकद्वारे केवायएसी अपडेट करून घ्या, त्यामध्ये (Online Fraud) आलेला ओटीपी मला सांगा’ असे सांगितले.

ओटीपी सांगताच अकाउंटमधून रक्‍कम वर्ग

सुशिक्षित नोकरदार असूनही कशाचीही पडताळणी न करता आलेला ओटीपी समोरच्‍या व्‍यक्‍तीला सांगितला. यानंतर त्यांच्या अकाऊंटवरून 1 लाख 39 हजार 900 रुपये कपात झाले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडलीय. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल कदम यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT