Beed Rain Saam tv
महाराष्ट्र

Beed Rain : बीड जिल्ह्यात पाच दिवसांपासून पावसाची संततधार; अंबाजोगाईचा काळवटी तलाव ओव्हरफ्लो

Beed News : एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना बीड जिल्हा मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मागील ५ दिवसापासून पावसाची संततधार सुरू

विनोद जिरे

बीड : साधारण आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र जीवन विस्कळीत झाले आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात देखील मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे वानबाजोगाईचा काळवटी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तर अन्य काही लघु प्रकल्प कोरडेच पडले आहेत.  

एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना (Beed) बीड जिल्हा मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मागील ५ दिवसापासून पावसाची संततधार सुरू असली तरी जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्प आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार (Rain) पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. तर हलक्या जमिनीवरील पिके जोमात आली असली तरी चांगल्या जमिनीवरील सोयाबीन पिवळी पडत आहेत.

काळवटी तलाव भरला 
दरम्यान जिल्ह्यातील काही भागात चांगल्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाच्या सततधारमुळे (Ambajogai) अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे या भागातील गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माऊलीच्या पालखीचं पुण्याहून सासवडकडे प्रस्थान

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT