Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने दोन गटात वाद; गावात तणाव, १६ जण ताब्यात

Beed News आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने दोन गटात वाद; गावात तणाव, १६ जण ताब्यात

विनोद जिरे

बीड : औरंगजेबाच्या फोटो आणि मजकुरावरून बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या आडस गावामध्ये दोन (Beed) गटात दगडफेक आणि हाणामारी झाली. ही घटना रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली असून बीडच्या धारूर पोलिसांनी (Police) याप्रकरणी १६ जणांना अटक केली असून २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Live Marathi News)

बीड जिल्ह्यातील आडस गावातील अरबाज शेख नावाच्या तरुणाने औरंगजेबाच्या फोटोसह किंग असं नाव लिहिलं होतं. त्यानंतर "ज्यांची बराबरी केली जात नाही, त्यांची बदनामी केली जाते." असा मजकूर लिहित व्हाट्सअप स्टेटस ठेवलं होतं. हे स्टेटस दुसऱ्या गटातील तरुणांनी पाहिल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी सदरील तरुणाकडे गेले असता दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली. यामुळे गावात (Kej) तणाव निर्माण झाला आहे. 

गावात पोलीस बंदोबस्त 
सादर घटनेची माहिती कळताच धारूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदरील प्रकार नियंत्रणात आणत १६ जणांना ताब्यात घेतले आहे. तर २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: सांगलीमध्ये घरात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Property Rules: 'कुलमुखत्यारपत्र' म्हणजे काय रं तात्या? जमीन,मालमत्तेच्या व्यवहारात कसा होतो फायदा?

SCROLL FOR NEXT