Beed News Land Scam Saam tv
महाराष्ट्र

Beed: हिंदू देवस्थान जमीन घोटाळा; भूखंड माफियांविरोधात गुन्हे दाखल होणार, औरंगाबाद खंडपीठाने आदेश

हिंदू देवस्थान जमीन घोटाळा; भूखंड माफियांविरोधात गुन्हे दाखल होणार, औरंगाबाद खंडपीठाने आदेश

Rajesh Sonwane

बीड : हिंदू देवस्थानाच्या जमिनी लाटणाऱ्या भूखंड माफियांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश (Mumbai) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे असे देखील आदेशात म्हटले आहे. (Tajya Batmya)

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा आहे. या प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा; असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने (Police) पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेली तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरावी, असेही म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. याचीच पोलखोल ग्राउंड वरून साम टीव्हीने बातमी दाखवत केली होती. त्यानंतर याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

याचिकेवर न्या. मंगेश पाटील आणि न्या. अभय वाघवसे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली.सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले आहेत. वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र, हिंदू देवस्थानच्या करीत नाहीत, ते गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी केली. यावर आता तक्रारदाराचे निवेदनच एफआरआय म्हणून गृहीत धरून, फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या आदेशाने आता भूखंड माफीया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह माफीयांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये आता कोणा कोणावर पोलीस गुन्हे दाखल करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT