Beed Shocking Money Dispute Case Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: धक्कादायक! व्यवसायिक भागिदारांमध्ये पैशाचा वाद, पायाला कुलूप लावून ठेवलं डांबून

Beed Shocking Money Dispute Case: बीडमध्ये व्यवसायिक भागिदारांमध्ये पैशांवरून वाद झाला. मुंबईला येत असताना एकाने दुसऱ्याच्या पायाला कुलूप लावून त्याच्याकडे असलेले पैसे घेऊन फरार झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Priya More

माधव सावरगावे, बीड

बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन व्यवसाय भागीदारात पैशावरून वाद झाला. या वादात एकाने दुसऱ्याच्या पायाला कुलूप लावून त्याला डांबून ठेवले. त्यानंतर त्याच्याकडे असलेले पैसे घेऊन फरार झाला. त्यानंतर पायाचे कुलूप घेऊन तक्रारदार थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहचला. या घटनेची सध्या चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आल्याची घटना घडली. बीडमध्ये राहणारे ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे या दोघांनी भागीदारीत मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरळीत सुरू होता. पण त्यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले.

मसाल्याचा व्यवसाय वाढीसाठी हे दोघेजण मुंबईला ३१ डिसेंबर रोजी निघाले होते. मात्र दत्ता तांदळे याने सोबतच्या ज्ञानेश्वर इंगळे याला डांबून ठेवून त्याच्या जवळ असलेली एक लाखापेक्षा अधिकची रक्कम लुटली. फक्त एवढ्यावरच न थांबता दत्ता तांदळेने ज्ञानेश्वर इंगळे याच्या पायाला कुलूप लावून त्यांना डांबून ठेवलं.

संधी शोधून ज्ञानेश्वर इंगळे याने थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. आता याच प्रकरणात पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दत्ता तांदळे हा देखील पाटोदा येथील पोलीस ठाण्यात तक्रार देतोय. मात्र थेट पायाला कुलूप लावून पोलिस अधिक्षक कार्यालयात आलेल्या या व्यक्तीची सध्या चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT