Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: बसचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली

Beed News : बसचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली

विनोद जिरे

बीड : बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Beed) सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. (Tajya Batmya)

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदनगर -अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश गावाजवळ पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे ते नांदेड शयनगाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यावरून शेतात बस शिरली. या गाडीत पंचवीस प्रवासी प्रवास करत होते. सहा प्रवासी गंभीर जखमी आहेत, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी (Bus Accident) हलवण्यात आले आहे. यावेळी लिंबागणेश गावकऱ्यांनी तात्काळ मदत केली.

सहा प्रवाशी जखमी 
बस अपघातात अनिता विक्रम थोरात (वय ४०, रा.खडकीघाट) यांच्या कमरेच्या मणक्याला मार लागला आहे. विक्रम यदा थोरात (वय ५०) यांना व राधाकिसन श्रीहरी कदम (वय ४५) यांना डोक्याला मार लागला आहे. रघुनाथ कोंडीबा थोरात (वय ५०) याचे डाव्या हाताचे बोट तुटले असुन शिवशाला महादेव रासकर (वय ६०, रा.भारज) यांना पायाला मार लागला असुन त्यांना रूग्णवाहिकेतुन बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT