Beed News Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Beed News: धनगर आरक्षणात रस्ता रोको आंदोलनाला गालबोट; रिक्षा चालकास मारहाण, तर पोलीसांना धक्काबुक्की

Beed News : धनगर आरक्षणात रस्ता रोको आंदोलनाला गालबोट; रिक्षा चालकास मारहाण, तर पोलीसांना धक्काबुक्की

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात (Beed) बीडच्या माजलगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पण या आंदोलनाला गालबोट लागले असून या आंदोलना दरम्यान पोलीस (Police) अधिकाऱ्यांना धक्काबुकी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

बीडच्या माजलगाव येथे धनगर आरक्षणाच्या रस्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. रास्ता रोको आंदोलनात धनगर समाज (Dhangar Reservation) मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनाला गालबोट लागले आहे. रास्ता रोको सुरू असताना रिक्षा चालक रिक्षा घेवून निघाला असताना रस्ता रोको करणाऱ्या काहीनी हुल्लडबाजी करत तरुणांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्याला देखील धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे रस्ता रोको दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

आंदोलक ताब्यात 

आंदोलनातील या प्रकारानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीडच्या माजलगाव जवळील परभणी चौकात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको सुरू असताना हा प्रकार घडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT