Pankaja munde suresh dhas Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भाजपात धुसफूस, पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस; शिस्तबद्ध भाजपातील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Political News: राज्यात भाजपला प्रचंड बहुमत मिळालंय. परंतू राज्यातच भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर येऊ लागलीये. आता भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंनीच आपल्याच पक्षातील आमदार सुरेश धसांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केलीय.. या वादाचं नेमकं कारण काय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीनंतर शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये बीडमधल्या दोन नेत्यांमधला संघर्ष अखेर असा समोर आला. सुरेश धसांनी वारंवार पंकजा मुंडेंवर निशाणा साधल्याने पंकजा मुंडेंनी थेट पक्षश्रेष्ठीचं दार ठोठावलंय. तर पंकजांच्या इशाऱ्यानंतर सुरेश धसांनीही पक्षश्रेष्ठींकडे धाव घेण्याचा इशारा दिलाय.

आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमने-सामने आले.. मात्र दोघांनी एकमेकांकडे बघण्याचंही टाळलंय. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने विरोधी पक्षाला आयतंच कोलित मिळालयं..

भाजपातील वाद चव्हाट्यावर

खरंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धसांच्या वादाचं मूळ हे विधानसभा निवडणुकीत आहे पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवार भिमराव धोंडेंचं काम केल्याचा आरोप धसांनी केला होता. आधीच धनंजय मुंडेंशी असलेलं वैर आणि त्यात पंकजा मुंडेंची भर पडल्याने धसांनी आपला मोर्चा मुंडे बंधू भगिनींविरोधात उघडला. दरम्यान पंकजा मुंडेंनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल तीन महिने उलटून गेले तरी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट न घेतल्याने धसांनी थेट पंकजा मुंडेंना फैलावर घेतलंय.

शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमधील धस आणि मुंडेंमधील संघर्ष समोर आलाय. पक्षाची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखण्यासाठी पंकजा मुंडेंच्या तक्रारीची दखल घेणार की पक्षश्रेष्ठीच पंकजा मुंडेंना जेरीस आणण्यासाठी धसांना ताकद देणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी... महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत भांडले पाहिजेत, अर्थ संकल्पावर बच्चू कडूंचा घणाघात

Monday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांना प्रगतीचा मार्ग गवसणार

Ladki Bahin Scheme: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

अर्थसंकल्प केवळ श्रीमंतांसाठी, निव्वळ पोकळ दावे; प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: कराडजवळील उंब्रज येथील गणेश धाब्याजवळ माल वाहतूक ट्रक पेटला

SCROLL FOR NEXT