Ration shop Saam tv
महाराष्ट्र

Beed News : ई पॉझ मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित; दोन महिन्यांपासून अडचण

Beed News : रेशन दुकानावर देण्यात आलेल्या ई-पॉझ मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त धान्य पुरवले जाते

विनोद जिरे

बीड : रेशन कार्ड धारकांना धान्य वाटप करताना त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारास ई-पॉझ मशीन देण्यात आले आहे. मात्र हे ई- पोझ मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळेच स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वाद देखील होत आहेत. 

रेशन दुकानावर (Ration Shop) देण्यात आलेल्या ई-पॉझ मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त धान्य पुरवले जाते. मात्र या मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे अनेक लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. दुकान दारांकडूनच हे धान्य मिळत नसल्याचा आरोप करत अनेक ठिकाणी दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वाद देखील निर्माण होत आहेत. (Beed) अनेक ठिकाणी ई- पॉझ मशीन प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहेत. याबाबत राज्य संघटनेशी चर्चा झालेली असून सकारात्मक चर्चा न झाल्यास बीड जिल्ह्यातील मशीन देखील प्रशासनाकडे जमा केल्या जाणार आहेत.

दोन महिन्यांचे धान्य नाही 

ई-पॉझ मशीनमधील बिघाडाची समस्या मागील दोन महिन्यापासून आहे. यामुळे लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातील स्वस्त धान्य आजही ग्राहकांना मिळालेले नाही. यामुळे लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT