Bajarang Sonawane Saam tv
महाराष्ट्र

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Beed News : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे.

विनोद जिरे

बीड : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून मतदारसंघात विजयाचा दावा केला जात आहे. यातच खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील विजय निश्चित असल्याचे सांगत बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती होणार आणि तुतारी वाजणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात विजय निश्चित असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती होणार आणि तुतारी वाजणारच असा विश्वास बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी व्यक्त केला. 

बीड जिल्ह्यात तुतारी वाजण्याचा विश्वास खासदार सोनवणे यांनी व्यक्त केल्यानंतर आष्टीत ना जातीसाठी ना धर्मासाठी मतदार मतदान करणार; तर आष्टी मतदार संघाच्या विकासासाठी मतदान केले जाणार असं म्हणत महाविकास आघाडीचे आष्टी मतदार संघाचे उमेदवार महेबूब शेख यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT