Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: मध्यरात्री उपोषणकर्त्याचे अंथरूण पेटवून जाळण्याचा प्रयत्न?; उपोषणकर्त्याचा गंभीर आरोप

मध्यरात्री उपोषणकर्त्याचे अंथरूण पेटवून जाळण्याचा प्रयत्न?; उपोषणकर्त्याचा गंभीर आरोप

विनोद जिरे

बीड : बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याचे मध्यरात्री अंथरूण पेटवून दिले. मात्र (Beed News) उपोषणकर्त्यांना जाग आल्याने, मोठा अनर्थ टळला आहे. उपोषणकर्त्याला अज्ञात व्यक्तीने जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

चरणदास वाघमारे असे उपोषणकर्त्याचे नाव आहे. शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथील (कै.) सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक आहेत. परंतु त्यांचा पगार होत नसल्याने पगार द्यावा म्हणून बीड जिल्‍हा परिषदेच्‍या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

आंदोलनस्थळीच मुक्कामी असताना मध्यरात्री १२ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या डोक्याखाली असलेल्या उशीला व अंथरुणाला अज्ञात व्यक्तिने आग लावली. डोक्याला गरम लागताच ते जागे झाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. जाणीवपूर्वक मला जाळण्याचा हा प्रयत्न केला गेला, असा आरोप वाघमारे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT