Beed News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: घर काढण्याची नोटीस दिल्याने 42 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असाच पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

विनोद जिरे

Beed News: बीडमध्ये प्रशासनाच्या धोरणाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय जमिनीवरील घर काढा अशी नोटीस बीड तालुका प्रशासनाने दिल्यानंतर, बीड शहरातील भारत अवचार या 42 वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन केले होते. मात्र चार दिवस उपचार केल्यानंतर भारत अवचार यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली असून आज अवचार यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय जमिनीवरील घर काढा अशी नोटीस बीड (Beed) तालुका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दिली होती. ज्यामुळे भारत अवचार या ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गेल्या 40 वर्षांपासून आम्ही इंदिरानगर भागामध्ये राहतोय. मात्र प्रशासनाची भूमिका ही आता आमच्या घरावर उठली आहे. तालुका प्रशासनाने संबंधित घर काढा अशी नोटीस दिली आहे.

मात्र त्याच जागेवर "नगरपालिकेने रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत भारत अवचार यांना घरकुल दिलं आहे. त्यामुळे अवचार यांनी या योजनेच्या पैशातून आणि उसनवारी करून घर बांधलं. मात्र बांधलेलं घर पाडा, अशी नोटीस दिल्यानंतर आता आपण राहायचं कुठं ? या विवचनेतून भारत अवचार यांनी 13 जून रोजी विष प्राशन केले आणि चार दिवसाच्या उपचारानंतर आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेनंतर संबंधित दोषींवर कारवाई करावी, भारत अवचार यांच्या परिवाराला न्याय द्यावा. अशी मागणी घेत बीडच्या जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह स्थानिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तसेच जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नसून मृतदेह ताब्यात घेणार नाही, असाच पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT