Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: धावत्‍या बसमध्‍ये प्रवाशाचे 58 हजार लंपास

धावत्‍या बसमध्‍ये प्रवाशाचे 58 हजार लंपास

विनोद जिरे

बीड : बीड बसस्थानकामधून परभणीला जाण्यासाठी बसने निघालेल्या प्रवाशाचे 58 हजार रुपये चोरट्यांनी लंपास (Robbery) केल्याची घटना घडली. यानंतर बस थेट (Police) पोलिस स्‍टेशनला नेवून प्रवाशांची तपासणी करण्यात आली. (Maharashtra News)

परभणीला (Parbhani) जाण्यासाठी बसने निघालेल्या प्रवाशाजवळ काही रोख रक्‍कम होती. परंतु, बस मार्गास्‍थ होत असताना प्रवाशाजवळ असलेली ५८ हजार रूपयांची रक्‍कम चोरट्याने लंपास केली. वडवणीत ही बाब निदर्शनास आल्यानंतर (Beed News) प्रवाशाने आरडाओरड सुरू केली. अखेर एसटी बस थेट वडवणी पोलीस ठाण्यात नेऊन तेथे बसमधील सर्वच प्रवाशांची झडती घेतली गेली.

तिकिटासाठी खिशात हात घातला अन्‌

तिकीट काढण्यासाठी खिशात हात घातला. तेव्हा 58 हजार रुपये गायब असल्याचे निदर्शनास आले. या दरम्‍यान बस वडवणीजवळ पोहोचली होती. चोरटा बसमध्येच असल्याचा संशय आल्याने बस थेट वडवणी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. बसमध्ये एकूण 46 प्रवासी होते. मात्र चोरटा आढळून आला नाही. दरम्यान अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT