Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: घरात कोणी नसताना शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

बीडमध्ये एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादाय घटना घडली आहे.

विनोद जिरे

Beed News: बीडमधून दुखद वृत्त हाती आलं आहे. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादाय घटना घडली आहे. बीडच्या पोखरी घाट गावात ही घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

बीडच्या पोखरीघाट गावात 52 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून जीवन संपवलं आहे. धनेश टाके असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी घरात कोणी नसताना शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान त्यांच्याकडे 50 ते 60 हजार रुपयांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे. याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

आठ वर्षीय चिमुकल्या मुलासह आईने संपवलं जीवन

यवतमाळ : आठ वर्षीय चिमुकल्या मुलासह आईने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना यवतमाळ शहरातील अशोकनगर परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.

रेश्मा वंडकर (वय ३८) आणि पूर्वेश वंडकर (वय ८) असे मृत आई व मुलाचे नाव आहे. दोघेही सिंहगड रोड कोल्हेवाडी पुणे येथे मुळ रहिवासी असून ते यवतमाळमधील अंबिका नगर येथे वास्‍तव्‍यास होते. आज सकाळच्‍या सुमारास रेश्‍मा व मुलगा पुर्वेश हे दोघेही घरात मृत अवस्‍थेत आढळून आले.

सदर घटनेबाबत परिसरातील नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्‍थळी दाखल होवून पंचनामा करत तपास सुरू केला आहे. मात्र रेश्‍मा वंडकर यांनी आत्‍महत्‍या का केली? याबाबत स्‍पष्‍ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT