Beed Accident Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident : बीड जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच; विविध अपघातात 5 जण ठार

बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे.

विनोद जिरे

Beed Accident News : बीड जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काल एकाच दिवशी विविध अपघातात, चार दुचाकीस्वार तर अन्य एक महिला असे 5 जण ठार झाले आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी परळी अंबाजोगाई महामार्गावर अपघात झाल्याने 3 दुचाकीस्वार ठार झाले होते. त्याचबरोबर गडी फाट्यावर देखील एक जण ठार झाला होता.

तर मंगळवारी रात्री देखील ट्रकने दुचाकी स्वराला चिरडल्याने तो जागीच ठार झाला होता. या सर्व घटना ताज्या असतानाच काल एकाच दिवशी विविध अपघातात (Accident) 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील कडा येथील मार्केट कमिटी समोर ट्रकने दुचाकीला समोरासमोर धडक देत, दुचाकीस्वाराला फरफटत नेलं. यामुळं दुचाकीवर बाबासाहेब गर्जे वय 47 आणि नारायण गोल्हार वय 51 दोघे रा. खिळद हे दोघे जागीच ठार झाले आहेत.

तर काल (१५ फेब्रुवारी) सायंकाळी गडी फाटा इथे एक, सायंकाळी बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात एक, केज तालुक्यात एक असे विविध अपघातात 3 जण ठार झाले आहेत. या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान वाहनधारकांनी आपली वाहनं काळजीपूर्वक चालवावीत, वाहनांचा वेग मर्यादेतच ठेवावा. असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT