Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : सुविधा नसलेल्या बीडमधील ३६ महाविद्यालयांना विद्यापीठाचा दणका; पीजीचे प्रवेश थांबवण्याचे आदेश

Beed News : बीड, आष्टी, आंबेजोगाई येथील माजी मंत्री क्षिरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या कॉलेजचाही समावेश

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : पिजी शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा नसलेल्या नामांकित ११३ कॉलेजमधील ऍडमिशन थांबवण्याचा धाडसी निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील एकूण ३६ कॉलेजचा सहभाग आहे. यामध्ये आमदार तसेच माजी मंत्र्यांच्या महाविद्यालयांचा देखील समावेश आहे. 

पीजी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा नसलेल्या महाविद्यालयामधील पीजी चे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाने काढले आहेत. यात प्रामुख्याने बीड मधील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध सौ के एस के काकू सोनाजीराव क्षीरसागर कला महाविद्यालयाला मोठा दणका आहे. तसेच जिल्ह्यातील बीड, आष्टी त्याचबरोबर आंबेजोगाई येथील माजी मंत्री क्षिरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, भाजपचे आमदार सुरेश धस, दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या कॉलेजचाही समावेश आहे. 

बीडच्या शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध केसर काकू सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाचा यामध्ये सहभाग असून वेळेवर वेतन न देणे, बायोमेट्रिक सुविधा नसणे, त्याचबरोबर इतर भौतिक सुविधा नसणे. मात्र यावरती केसर काकू सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयातील प्राचार्यांनी या संदर्भात म्हटले आहे, की सौ. के. एस. के महाविद्यालयाचे पूर्णपणे नाव वगळण्यात आले नाही. काही विषयांना थांबवण्यात आले आहे. १५ पदव्युत्तर विषय चालतात. त्यापैकी सात विषयांना मान्यता मिळाली तर आठ विषयांना तांत्रिक अडचण असल्यामुळे थांबवण्यात आले आहे.  

पूर्तता करून विद्यापीठास सुपूर्द करणार 

काही त्रुटी असल्यामुळे हे थांबवण्यात आले आहे. तांत्रिक त्रुटी असल्यामुळे आम्ही त्या तात्काळ सुधारून घेऊ. आमच्या कॉलेजमध्ये ग्रंथालय, क्रीडांगण, काही टेक्निकल गोष्टी आहेत. बायोमेट्रिकचा विषयी वेतन पगार पत्रक या तांत्रिक गोष्टी आहेत. या संपूर्ण गोष्टींचे पूर्तता करून विद्यापीठात सुपूर्त करू; असे केसर काकू सोनाजीराव क्षीरसागर मधील उपप्राचार्य संजय पाटील यांनी सांगितले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: चिमुकल्याच्या कानात तीव्र वेदना, पालकही गोंधळले...; मशीनने तपासल्यावर डॉक्टरही झाले शॉक!

Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये चुकूनही अशा टाईल्स वापरू नका; घरात कलह होण्याची वाढते शक्यता

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Makhana Smoothie Recipe: वजन होईल कमी झटक्यात कमी; पौष्टीक मखाना-फ्रूट प्रोटीन स्मूदीची वाचा सोपी रेसिपी

Carrot Gulab Jamun : गाजराचा हलवा नेहमी खाल्ला आहे, पण कधी गाजर गुलाब जाम ट्राय केलेत? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT