Dengue Disease Saam tv
महाराष्ट्र

Dengue Disease: डेंग्यूने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; बीडच्या दिंद्रुड गावातील घटना

Beed News : डेंग्यूने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; बीडच्या दिंद्रुड गावातील घटना

विनोद जिरे

बीड : साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यात डेंग्यू आजार राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत आहे. या आजाराला (Dengue) आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला मात्र अपयश येत आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला असून (Beed) बीड जिल्ह्यात डेंग्यू आजाराने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. (Tajya Batmya)

डेंग्यूच्या आजाराने २१ वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना बीडच्या दिंद्रुड गावात उघडकीस आली आहे. विशाल शंकर घुले असे मृत तरुणाचे नाव आहे. डेंगूची लागण झाल्याने तो गेल्या आठ दिवसापासून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार घेत होता. काल सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. 

गावात अनेकांना लागण 

दिंद्रुड गावात अनेकांना डेंगूची लागण झाली असून आरोग्य विभाग व हिवताप नियंत्रक विभागाने तात्काळ डेंगूवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT