Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : दुष्काळामुळे अगोदरच पाणी टंचाई; आता २०९ पाणी नमुने दूषित, बीड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

Beed News : बीड जिल्ह्यातील नागरिक विहीर, बोअर अथवा हातपंपाचे पाणी पित असतात. या पाण्याचे स्त्रोत दुषित आहेत का? याची वर्षातून दोनदा तपासणी होत असते.

विनोद जिरे

बीड : यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे अगोदरच पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या बीड (Beed) जिल्ह्यात तब्बल २०९ पाणीनमुने दुषित आढळून आले आहेत. त्यामूळे दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे. आता नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील नागरिक विहीर, बोअर अथवा हातपंपाचे पाणी पित असतात. या पाण्याचे स्त्रोत दुषित आहेत का? याची वर्षातून दोनदा तपासणी होत असते. नागरिकांच्या आरोग्याला पाण्यापासून धोका होऊ नये. यासाठी भुजल विभाग प्रयत्नशील असतो. मान्सुनपुर्व आणि मान्सूननंतर अशी तपासणी केली जात असते. डिसेंबर अखेर २०९ ठिकाणचे पाणी नमुने दुषित असल्याचा अहवाल स्वच्छ भारत मिशन विभागाकडे (Water Crisis) आलेला आहे. जिल्हा प्रयोग शाळेच्या माध्यमातून १ हजार १८६ पाणी नमुने तपासण्यात आलेले आहेत. यातील २०९ पाणी नमुने हे पिण्यासाठी आयोग्य आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गटार, कारखान्याचे दूषित पाणी ओढ्यात जिल्ह्यातील विविध भागात गटाराचे, कारखान्यांचे पाणी ओढ्यांना सोडले जाते. परिणामी, त्या भागातील स्त्रोत दुषित होत असतात. ज्या भागात कारखाने आहेत, अशा भागात पिण्याचे पाणी दुषित झालेले आहे. विहीर, बोअरवेल आणि हातपंपाला पाणी असताना ते आता पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. तसेच दूषित पाणी पिऊ नका, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT