Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News : आई-वडील शेतात, घरी बारावीच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; ह्रदयद्रावक घटना

Beed Crime News : बारावीची परीक्षा झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने घरातील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

विनोद जिरे

Beed Crime News : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारावीची परीक्षा झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने घरातील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना जिल्ह्यातील कारी गावात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

वैष्णवी बापुराव फरताडे (वय १७ वर्ष) असे आत्महत्या (Crime News) केलेल्या मुलीचे नाव आहे. नुकतीच वैष्णवीची बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. परीक्षेनंतर वैष्णवी नैराश्यात होती. कुटुंबीयांनी तिचे समुपदेशन केले. मात्र, तरीही ती नैराश्यात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, आई-वडील आणि भाऊ शेतात कामासाठी गेले असताना घरात (Beed News) एकटी असलेल्या वैष्णवीने घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT