Maratha Reservation Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: आमदार प्रकाश सोळुंके यांच्या कार्यालयासह घरावर दगडफेक; पार्किंगमधील गाड्या जाळल्या

Beed News : आमदार प्रकाश सोळुंके यांच्या कार्यालयासह घरावर दगडफेक; पार्किंगमधील गाड्या जाळल्या

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आता अधिक चिघळत चालले आहे. यात (Beed) मराठा आंदोलक तरुण आक्रमक झाले आहेत. (NCP) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या कार्यालयासह घरावर मराठा आंदोलक तरुणांनी तुफान दगडफेक केली. तसेच घर आणि कार्यालयातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या देखील जाळल्या आहेत. (Live Marathi News)

बीडच्या माजलगावमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. येथे आंदोलन सुरु असताना मराठा (Maratha Reservation) आंदोलक तरुणांनी आमदार प्रकाश साळुंके यांच्या घरावर दगडफेक केली. दगडफेक केल्यानंतर आंदोलक तरुणांनी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये आणि घराच्या पार्किंगमध्ये लावलेल्या ५ चारचाकी गाड्या जाळून टाकल्या आहेत. त्याचबरोबर दुचाकी देखील जाळून टाकल्या आहेत. यामध्ये पोलिसांच्या दुचाकी देखील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरात तणावपूर्ण वातावरण 
दरम्यान माजलगाव शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलक तरुणांनी थेट आमदार प्रकाश साळुंके यांचे निवासस्थान टार्गेट केल्याने वातावरण चिघळलं आहे. यामध्ये प्रकाश सोळुंके यांच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर कार्यालयासह घराची देखील मोठी तोडफोड झाली आहे. त्याचबरोबर सोळुंके यांच्या बंगल्याचा मोठं नुकसान यावेळी मराठा आंदोलकांनी केले. दरम्यान सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त प्रकाश सोळुंके यांच्या घराच्या परिसरात पाहायला मिळत असून मराठा आंदोलक मात्र आक्रमक झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

SCROLL FOR NEXT