Beed News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: संतापजनक! चक्क महिला कर्मचाऱ्यांकडून होतेयं पैशाची वसुली; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

या प्रकारानंतर रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

विनोद जिरे

Beed News: बीड जिल्हा रुग्णालयात (Beed District Hospital) प्रसूती कक्षात महिला कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकाकडून पैशाची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. (Beed Latest News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड (Beed Hospital) जिल्हा रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मागणी करत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारानंतर रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

डिलिव्हरी काम करणाऱ्या मावशी या प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या नातेवाईकाकडून चांगले सेवा देण्याच्या नावाखाली पैशाची वसुली करत असल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे..

दरम्यान, या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांना विचारलं असता चौकशी करून या प्रकरणात कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी सामटीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. या प्रकरणात आता प्रशासन काय कारवाई करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT