Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagar Saam tv
महाराष्ट्र

Mla Sandeep Kshirsagar Latest News: 'एकाच कुटुंबातील शंभर लोकांची नावे मतदार यादीत' आमदार संदीप क्षीरसागर यांचा काका जयदत्त यांचं नाव न घेता गंभीर आरोप

विनोद जिरे

Beed Latest News: बाजार समितीच्या निवडणुकीवरून बीडमध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या मतदार यादीवरून पुन्हा एकदा क्षीरसागर काका पुतणे आमने सामने येण्याची शक्यता असून पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) यांनी काका जयदत्त क्षीरसागरांवर गंभीर आरोप केले आहेत.

व्यापारी मतदारांचे नावं वगळून घरातील आणि एकाचं कुटुंबातील जवळपास 100 लोकांची नावे लावण्यात आले आहेत. जालण्याच्या लोकांची नावे इथं लावली आहेत. असा गंभीर आरोप पुतणे संदीप क्षीरसागर यांनी नाव न घेता जयदत्त क्षीरसागरांवर केला आहे. त्याचबरोबर या सर्वांना नेमकं लायसन्स कोणी दिलं? हा माझं प्रश्न आहे. हे सर्वजण घाबरले असून ही निवडणूक आम्ही जिंकून झेंडा लावणारचं. असा निश्चय संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) यांनी केलाय.  (Latest Marathi News)

संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) सर्वपक्षीय आयोजित शेतकरी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण, वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्यासह काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, शेतकरी अनुदान संघर्ष समिती, शेतकरी सुकाणू समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (Beed Latest News)

यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) म्हणाले की, ही निवडणूक कुणाला खिंडीत पकडण्यासाठी नाही. तर गेली चाळीस वर्षांपासून एकहाती असलेली सत्ता पाडण्यासाठी, आम्ही मार्केट कमिटी निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या सोबत हमाल मापाडी देखील आहेत. असंही यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले.

बाजार समितीच्या मतदार यादीत हमाल मापाडी आणि व्यापारी यांचे नाव असतात. ही काही ग्रामपंचायत निवडणुकीची मतदार यादी नसते, मात्र या बाजार समितीच्या मतदार यादीत जर तुम्ही पाहिलं, तर व्यापाऱ्यांच्या यादीतील व्यापाऱ्यांचे नाव उडवले आहेत. सर्वात महत्त्वाचं घरच्या लोकांचे नाव या मतदार यादीत लावले आहेत. याचाच अर्थ विरोधक घाबरले आहेत. यामुळे विश्वासाने आम्ही ही निवडणूक जिंकणारच आहोत. त्यामुळे निश्चितपणे बीड मार्केट कमिटीवर आपण झेंडाचं लावणार, असं टीकास्त्र सोडत झेंडा लावण्याचा निश्चय देखील यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT