beed accident  Saam tv
महाराष्ट्र

बीडमध्ये भीषण अपघातात तहसीलदाराचा जागीच मृत्यू, प्रशासकीय कर्मचार्‍यांवर शोककळा

beed accident : बीडमध्ये अपघाताच्या घटना सुरूच आहे. बीडमध्ये केज तहसीलदाराचा जागीच अपघाती मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

बीडमध्ये पुन्हा भीषण अपघात झाला आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या नेहरूनगर कॉर्नरवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बीडच्या केज येथे कार्यरत असलेले तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तहसीलदाराच्या मृत्यूने प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

बीडमधील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज बुधवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ भीषण कार अपघातात झाला. या कार अपघातात गिड्डे यांचा मृत्यू झालाय. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते, त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

प्राथमिक माहितीनुसार, ते कारमध्ये एकटेच होते. अचानक वेग वाढल्याने नियंत्रण गमावून त्यांची कार उलटली, असा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला आहे. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेतली.

पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. एक कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

तत्पूर्वी, बीडच्या अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. काल बँक अधिकारी आणि आज तहसीलदाराचा अपघाती मृत्यू झाल्याने बीडमधील रस्ते वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा जप्त

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

SCROLL FOR NEXT