Kej Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kej Crime News : बोलली नाहीस तर आत्महत्या करीन, तुझ्या आई- वडिलांनाही मारीन; धमकावत शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

Beed News : शाळा- महाविद्यालय परिसरात तसेच रस्त्यांवरून जाणाऱ्या मुलींचा विनयभंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच केज तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: केज तालुक्यातील एका गावात नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत, तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझ्या आई- वडिलांनाही मारीन; अशी धमकी देत तरुणाने या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुण निखिल कांबळे याच्यावर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळा- महाविद्यालय परिसरात तसेच रस्त्यांवरून जाणाऱ्या मुलींचा विनयभंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच केज तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन शाळकरी मुलीचा मागील १५ दिवसांपासून तरुणाकडून दुचाकीवरून पाठलाग सुरू होता. यात ४ जुलैला त्याने मुलीला धमकावण्याचे टोक गाठलं. इतकंच नाही, तर मुलीच्या घरचे त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता एका महिलेला देखील त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

तरुणावर गुन्हा दाखल 

दरम्यान घटनेत मुलगी रस्त्याने जात असताना निखिल हा पाठलाग करत तिच्याजवळ आला. यानंतर तिला माझाशी बोलली नाही तर आत्महत्या करेन आणि तुझ्या घरच्यांनाही मारेल अशी धमकी दिली. घडल्या प्रकाराबाबत मुलीने घरच्यांना सांगितले. यानंतर याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

दोन दिवसांपूर्वीच तरुणाच्या वडिलांवर विनयभंगाचा गुन्हा

गेल्या आठ दिवसातील केज पोलीस ठाणे हद्दीतील महिला अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. वाल्मीक कराडचा समर्थक असलेल्या नानासाहेब चौरे याने गतिमंद मुलीवर अत्याचार केला होता. तर बाळू कांबळे याने गतिमंद तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर बाळू कांबळेचा मुलगा निखिल कांबळे याने शाळकरी मुलीचा विनयभंग केला आहे. धक्कादायक म्हणजे या आरोपी निखिल कांबळेचा वडील बाळासाहेब कांबळे याच्या विरोधात देखील २ दिवसांपूर्वीच एका गतिमंद तरुणीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT