Beed : "नो कमेंट्स" पत्रकारांच्या प्रश्नांना करुणा मुंडेंचं उत्तर! SaamTvNews
महाराष्ट्र

Beed : "नो कमेंट्स" पत्रकारांच्या प्रश्नांना करुणा मुंडेंचं उत्तर!

अखेर करुणा शर्मा या 16 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर कारागृहाच्या बाहेर आल्या आहेत. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी "नो कमेंट्स " उत्तर देत बोलण्यास नकार दिला.

विनोद जिरे

बीड : अखेर करुणा शर्मा या 16 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर कारागृहाच्या बाहेर आल्या आहेत. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी "नो कमेंट्स " उत्तर देत बोलण्यास नकार दिला. करुणा शर्मा या 5 सप्टेंबर ला परळीत पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र यावेळी वैद्यनाथाचे दर्शन घेतांना त्याठिकाणी गोंधळ उडाला होता. मात्र त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्यासह ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

हे देखील पहा :

त्यानंतर त्यांना 6 तारखेला अंबाजोगाई सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दरम्यान 14 सप्टेंबर या दिवशी सुनावणी झाली होती. मात्र त्यांना पुढील 18 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र 18 तारखेला कोर्टाला सुट्टी असल्याने, त्यांना 20 तारीख देण्यात आली होती. यावेळी काल 20 तारखेला सुनावणी झाली असून आज त्यांचा जामीन झाला आहे. अखेर करुणा शर्मा या 16 दिवसाच्या कोठडी नंतर आज बीड जिल्हा कारागृहाच्या बाहेर आल्या आहेत.

करुणा शर्मा प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. शर्मा कारागृहाच्या बाहेर आल्यावर काय बोलणार ? हे पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र आज शर्मा यांनी कारागृहाबाहेर आल्यावर मीडियाच्या प्रश्नाला नो कमेंट्स म्हणत एकप्रकारे बोलण्यास नकार दिला आहे. आता करुणा शर्मा यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक

Jio Recharge Plan : ३३६ दिवसांसाठी जिओचा बजेट फ्रेंडली प्लॅन! डेटा, ओटीटी अन् बरेच काही, किंमत फक्त...

Mumbai : एकतर्फी प्रेमातून विक्रृती, महिलेचं स्नॅपचॅट हॅक केलं अन् इंस्टावर अश्लील व्हिडीओ....

Jio Annual Plan : जिओचा भन्नाट वार्षिक प्लॅन! एकदाच रिचार्ज करा अन् मिळवा ९१२.५ GB डेटा अन् बरेच काही...

NCP clash Pune : पुण्यात राष्ट्रवादीत राडा, शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT