Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : शेतकऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला; अवैध वाळू वाहतुकीला अडथळा केल्यातून घटना

Beed News : बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे. यामुळं वाळू माफियांची मोठी दहशत या परिसरात पाहायला मिळते आहे

विनोद जिरे

बीड : अवैध वाळू वाहतूक अगदी सर्रासपणे सुरु आहे. याला आळा घालण्यात प्रशासन देखील हतबल झाले आहे. दरम्यान बीडच्या गेवराई तालुक्यात अशाच प्रकारे होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला शेतकऱ्याने अडथळा निर्माण केला होता. यातून वाळू माफियांनी शेतकऱ्यांवर हल्ला चढविल्याची घटना घडली आहे.  

बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे. यामुळं वाळू माफियांची मोठी दहशत या परिसरात पाहायला मिळते आहे. अशातच सुरळेगाव येथे वाळू वाहतुकीला आडव्या आलेल्या (Farmer) शेतकऱ्यांवर वाळू माफियाने कोयत्याने वार करत हल्ला केला. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी असून शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अकरा जणांवर गुन्हा दाखल 

याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान गोदावरी नदी पात्रालगत असलेल्या गावांमध्ये वाळू माफियांची दहशत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT