govind barge pooja gaikwad x
महाराष्ट्र

Beed : बीडचे माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, पूजा गायकवाडच्या नावावर प्लॉट केल्याची धक्कादायक माहिती समोर

Beed News : माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. नर्तिका पूजा गायकवाडला गोविंद बर्गे यांनी बार्शीत दीड गुंठ्याचा प्लॉट दिल्याचे समोर आले आहे.

Yash Shirke

  • माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

  • नर्तिका पूजा गायकवाडच्या नावावर दीड गुंठा प्लॉट दिल्याचे समोर.

  • कोर्टाने पूजाला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Shocking : बीड जिल्ह्यातील गेवराईच्या लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी न्यायालयाने नर्तिका पूजा गायकवाडला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या पूजा गायकवाडला गोविंद बर्गे यांनी बार्शी येथे दीड गुंठ्याचा प्लॉट दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडला दीड गुंठ्याचा प्लॉट दिला होता. या खरेदी व्यवहाराचा पुरावा साम टीव्हीच्या हाती आला आहे. पूजा गायकवाडच्या नावे केलेल्या दीड गुंठ्याच्या प्लॉटमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे साक्षीदार असल्याचे समोर आले आहे. बार्शीच्या वैराग येथील प्लॉटची किंमत पाच ते सहा लाख रुपये इतकी आहे. यावरुन गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी केलेला दावा खरा ठरला असे म्हटले जात आहे.

नर्तिका पूजा गायकवाड प्लाॅटसह दागदागिने, दोन लाख रुपये किंमतीची मोबाईल फोन गोविंद बर्गे यांनी घेऊन दिल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता. बार्शीतील वैराग येथे पूजाला त्यांनी प्लाॅट दिल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावा आता खरा ठरला आहे. याचा पुरावा साम टीव्हीच्या हाती लागला आहे. नर्तिका पूजा गायकवाडच्या नावे केलेल्या प्लॉटच्या व्यवहाराच्या कागदपत्रांवर गोविंद बर्गे यांचे नाव आणि सही आढळून आली आहे. हा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक वस्तू, दागदागिने, पैसे, महागडे मोबाईल पूजाला घेऊन दिल्याचे निश्चित होऊ शकते.

माजी उपसरपंच गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा गायकवाड यांचे प्रेमसंबंध होते असे म्हटले जात आहे. पूजाने तिच्या नावावर बंगला करण्यासाठी गोविंद यांच्याकडे सतत तगादा लावला होता. तिच्यामुळेच गोविंद यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कोर्टाने तिला ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाही; पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

Bus Accident: चालकाला हार्ट अटॅक आला, ४० प्रवाशांना घेऊन जाणारी भरधाव बस उलटली

Crime News : पत्नी आणि मेव्हुणीनं गळा दाबून खून केला, साडूनं शेतात मृतदेह लपवला; बीडमधील हत्याकांडानं अख्खं राज्य हादरलं

Pune News: पवाना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत...

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन; स्वागतावेळी हेलिपॅडवर हायहॉल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT