Beed News Saam
महाराष्ट्र

Beed: पावसात कांदा वाहून गेला अन् शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, कर्जामुळे बळीराजानं आयुष्य संपवलं

Beed Farmer Takes Own Life: अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

Bhagyashree Kamble

बीडच्या आष्टी तालुक्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. हवालदिल शेतकऱ्यानं शेतातच झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे, सोबत शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक संकट घोंघावत आहे. अशातच शेतीचे नुकसान आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बीडच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

गोविंद रंगनाथ आंधळे (वय ४२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याशिवाय, त्यांच्या डोक्यावर सुमारे १० लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी स्वतःच्या शेतातच झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं.

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. शासनाने आणि प्रशासनाने वेळेवर मदत केली असती, तर हे टाळता आले असते, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. "शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार अजून किती वेळ थांबणार?" असा संतप्त सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

वारजे टेकडी परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू

पुणे : शहरातील वारजे टेकडी परिसरात एक संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (३१ मे) सकाळी उघडकीस आली. परिसरातील नागरिकांना एक व्यक्ती झाडाला लटकलेली दिसल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पाहणी केली असता, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT