स्त्री रुग्णालय नेकनूर  विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: 50 वर्षीय महिला रुग्णासोबत डॉक्टराचं अश्लील वर्तन! धक्कादायक प्रकाराने खळबळ

महिलेची वैद्यकीय अधिक्षकांकडे तक्रार

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 50 वर्षीय महिले सोबत, चक्क डॉक्टरानेचं अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या (Beed) नेकनूर येथे उघडकीस आलाय. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून डॉक्टरी (Doctor) पेशाला काळिमा फासणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी केली जात आहे. ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला तिने वैद्यकीय अधीक्षकाला घडलेल्या सर्व प्रकाराची आपबिती सांगितलीय. तर या घटनेने वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. (Beed Crime News)

बीडच्या नेकनूर येथील कुटीर रुग्णालयामध्ये, पायाला खाज सुटल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेला, तपासणी करण्याच्या बहाण्याने घेऊन जात, आतून कडी लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप महिलेने केलाय. या रुग्णालयात आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक बांगर याने हा प्रकार केला असून दारूच्या नशेत त्याने हे दुष्कृत्य केल्याचा देखील आरोप करण्यात आलाय.

हे देखील पहा-

या संदर्भात पीडित 50 वर्षीय महिलेने तिच्या सोबत घडलेला प्रकार वैद्यकीय अधीक्षक डॉ शिंदे यांना सांगितला. यानंतर या डॉक्टर विरोधात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार केली असल्याचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितलय. दरम्यान या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली असून सदरील डॉक्टर बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT