Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: हाणा याला हाणा आता...; शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या मुंडेला गावकऱ्यांनी केसाला धरून तुडवलं| VIDEO

Shivraj Divte Assault Accused Beaten by Crowd: बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या समाधान मुंडेला गावकऱ्यांनी केसाला धरुन तुडवलं. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडच्या परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाचे अपहण करून त्याला डोंगरपट्ट्यात नेऊन १० ते १५ जणांच्या टोळीने अमानुष मारहाण केली होती. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे तर उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहेत. याचदरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान मुंडेला गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गावकऱ्यांनी भरचौकात समाधान मुंडेला तुडवल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

बीडच्या परळी येथे सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये समाधान मुंडेला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण जलालपूर भागात होत असल्याची माहिती समोर आली आहे. समाधान मुंडे हा तोच आरोपी आहे ज्याने शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण केली होती. समाधान मुंडेला मारहाण होत असलेला व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये असलेल्या समाधान मुंडेचे केस धरून काही गावकरी त्याच्या काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसत आहे. समाधान मुंडेच्या विरोधात जमानाचा संताप दिसून येत आहे.

परळीच्या लिंबोटा येथे राहणाऱ्या शिवराज दिवटे या तरुणाचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पेट्रोल पंपासमोरून अपहरण करण्यात आले होते. जलालपूर भागातील डोंगरपट्ट्यात असलेल्या रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन १० ते १५ जणांच्या टोळीने या तरुणाला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांप्रदायिक कार्यक्रमाच्या जुन्या वादावरून या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. समाधान मुंडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी शिवराज दिवटे या तरुणाला ही मारहाण केली होती.

शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी परळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. समाधान मुंडेच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी लिंबोटा गावाचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रविवारी सकाळी बीड-परळी मार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. 'उद्याचा बंद हा शांततेत होणारा असून हा बंद कोणा एकाचा नाही. शांतता प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने शिवराज दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे.', असे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT