Satish Bhosale  Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale : खोक्याचा बोक्या शोधा! पाप धुवायला गेला आणि अडकला, पोलिसांनी आवळल्या सतीश भोसलेच्या मुसक्या

Beed Crime : सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेला पोलिसांनी अखेर जेरबंद केलंय.. मात्र 8 दिवस गुंगारा देणारा खोक्या पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला आणि खोक्याच्या अटकेनंतर विरोधकांनी नेमकी काय मागणी केलीय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमानुष मारहाण करणारा, नोटा उधळणारा, हेलिकॉप्टरमधून फिरुन दहशत माजवणारा खोक्या. पोलिसांच्या रडारवर आलेल्या खोक्याच्या अखेर मुसक्या आवळल्यात. पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलेल्या खोक्याला स्थानिक पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

खोक्याभाई जाळ्यात कसा अडकला?

- सतीश भोसले बसनं प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता

- प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता

- बीडचे आणि प्रयागराज पोलीस अधीक्षकांच्या मदतीनं विमानतळावरुन अटक

- सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता

- पोलिसांनी त्यावरूनच लोकेशन ट्रेस केलं आणि खोक्या अडकला

तर आपल्या कार्यकर्त्याच्या अटकेचं भाजप आमदार सुरेश धसांनी स्वागत केलंय.. तर विरोधकांनी याप्रकरणी अधिक खोलात जाऊन चौकशी करण्याची मागणी केलीय. खोक्या भोसलेच्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भोसले आठ दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर खोक्या भोसलेला पोलिसांनी जेरबंद केलंय.. यादरम्यान खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आलेत.

खोक्यावर कोणते आरोप?

- खोक्याने दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंना मारहाण केल्याचा आरोप

- बुलढाण्याच्या कैलास वाघला अमानुष मारहाण

- हरीण, काळवीट, मोर आणि सश्यांच्या कत्तलीचा आरोप

- शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना धमकी

- नोटा उधळून माज दाखवल्याचा आरोप

खोक्या भोसलेचे कारनामे समोर आल्यानंतर पोलीस खोक्याच्या मागावर होते.. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खोक्याने थेट प्रयागराज गाठून गंगेत डुबकी मारली.. त्याआधी देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडही पोलीस संरक्षणासह उज्जैनच्या महाकालपुढे नतमस्तक झाला आणि त्यानंतर पोलिसांना शरण आला.. तर आता कृष्णा आंधळेही दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आढळून आलाय.. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांनी देवापुढे लोटांगण घातलं तरी देवही त्यांना माफ करत नसल्याचंच सिध्द झलंय. आता खोक्या तर अडकला असला तरी पोलीस खोक्यानंतर त्याच्या आकाच्याही मुसक्या आवळणार का? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT