Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: भयंकर! गुप्तधनासाठी नरबळी द्यायचा होता, भोंदूबाबानं बापाकडेच केली कुमारी मुलीची मागणी

Beed News : धक्कादायक प्रकार.. गुप्तधनासाठी चक्क बापाकडेच कुमारी मुलीची मागणी; कुटुंब नष्ट करायची भोंदूबाबाची धमकी

विनोद जिरे

बीड : गुप्तधन काढण्यासाठी कन्याबळी द्यावा लागेल. यासाठी बापाकडेच पोटच्या १६ वर्षाची मुलीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा बळी देवून गुप्तधन (Crime News) काढतो, असं सांगणाऱ्या एका भोंदूबाबाविरोधात (Beed) बीडच्या अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील दादाराव घोशिर या भोंदूबाबाने पुणे येथे असलेले गुप्तधन काढायचे आहे. त्यासाठी गावातील व्यक्तीला तुमची १६ वर्षाची मुलगी मला द्या, तिला सजवायचे आहे, नटवायचे आहे आणि तिचा बळी द्यायचा आहे. मग गुप्तधन मिळेल, त्यातील काही धन तुम्हाला देतो असे प्रलोभन दाखवले. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितली, तर तुमच्या घरादाराला नष्ट करू, अशी धमकी देखील या भोंदूबाबाने दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर दक्ष असलेल्या या व्यक्तीने थेट अंमळनेर पोलीस (Police) ठाणे गाठून भोंदूबाबाविरोधात तक्रार केली. गुप्तधनासाठी कन्याबळी देण्याचा हा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर अनुचित प्रकार घडू नये; म्हणून कोतन गावच्या गावकऱ्यांनी बैठक घेऊन या संदर्भात पोलीस प्रशासनाला देखील कळवले आहे. मात्र या घटनेमुळे कोतन गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : नागपूर जिल्ह्यात शेवटच्या क्षणी मतदारांची मोठी गर्दी

Maharashtra Live News Update: प्रेम कुमार यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड

Ranveer Singh: मी माफी मागतो...; 'कांतारा' च्या देवाला 'महिला भूत' म्हणल्याने रणवीर सिंग अडचणीत, स्पष्टीकरण देत म्हणाला...

मतमोजणीची अशी चूक पुन्हा नकोच, निवडणुकीसाठी गाईडलाईन्स करा, कोर्टाने आयोगाला सुनावले

'तुझा संतोष देशमुख करू', उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेत्याला धमकी; पुण्यात नेमकं चाललंय काय?

SCROLL FOR NEXT