Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : शेतात दगड का टाकले?; जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण

Crime News Beed: शेतात दगड टाकण्याच्या कारणातून वादाला सुरवात होऊन दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात हाणामारी, मारहाण, शुल्लक कारणातून खून अशा घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे आता बीडचे बिहार झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शेतात दगड टाकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. दगड का टाकले? असे विचारण्याचा राग आल्याने दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शिरूर कासार तालुक्यात घडली आहे. 

बीड जिल्ह्यातील पालवण याठिकाणी दोन दिवसांपूर्वी शेतीच्या वादातून भावकीतील मंडळींकडून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिरूर कासार तालुक्यातील खोलेवाडी येथे शेतात दगड टाकण्याच्या कारणातून वादाला सुरवात होऊन दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

भावकीतील मंडळींकडून मारहाण 

दरम्यान खोलेवाडी येथील जानु केदार हे आपल्या शेतात काम करत होते. यावेळी त्यांच्या भावकीतील लोकांनी त्यांच्या शेतात दगड टाकले. यावरून आमच्या शेतात दगड का टाकले? असे जानू केदार यांनी विचारले. या नंतर तुझ्यासोबत मला वाद करायचा आहे, आणि तुला जीवे मारायचे आहे; असे म्हणत तुकाराम केदार आणि आप्पा केदार या दोघांनी लोखंडी रॉडने आणि दगडाने बेदम मारहाण केली.

दोघे गंभीर जखमी 
जानु केदार आणि रंगनाथ केदार यांना भावकीतील तुकाराम केदार आणि आप्पा केदार या दोघांनी लोखंडी रॉडने आणि दगडाने बेदम मारहाण केली. तर मारहाण करताना तुकाराम केदार यांना तुला जिवे मारणार असल्याची देखील धमकी आरोपींनी दिली. या मारहाणीत जानु केदार आणि रंगनाथ केदार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरूर कासार पोलिसात यासंदर्भातली तक्रार देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर टिकणार का?

Husband-Wife: तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त फोनकडे लक्ष देतो, फक्त अफेअर नाही, असू शकतं 'हे' कारण

Pune Ganapati Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Maharashtra Live News Update: गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक; राज्यातील २ रेल्वे मार्गाला ग्नीन सिग्नल, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT