Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: धक्कादायक! महाराष्ट्रातून ट्रक पास करण्यासाठी हजारो रुपयांची लूट; वाहन चालकाचे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप

Crime News: विशेष म्हणजे पोलिसांकडून ट्रक चालकांना हे पास पत्त्यासारख्या कार्डवर दिले जातात.

विनोद जिरे

Beed News:

बीडमधून पोलिसांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गावर चालणाऱ्या ट्रक चालकांना महाराष्ट्र राज्य पास करायचे असेल तर तब्बल 2500 रुपये वाटावे लागतायत. तामिळनाडूवरून राजस्थानला लसूण घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने या सर्व प्रकाराची पोलखोल केली आहे. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे पोलिसांकडून ट्रक चालकांना हे पास पत्त्यासारख्या कार्डवर दिले जातात. या कार्डवर हा पास कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत चालेल हे देखील नमूद केलेलं आहे. साम टीव्हीने हा सर्व प्रकार समोर आणलाय.

आज TN 40 P 1131 या क्रमांकाचा ट्रक तामिळनाडूहुन लसूण घेऊन राजस्थानला जात असताना, बीड शहरालगत बायपासवर सकाळी 6 वाजता पोलिसांनी अडवला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझ्या ट्रकला रिप्लेक्टर नाही. असं म्हणत त्याला तीनशे रुपयाची पावती फाडण्यास सांगितलं.

मात्र ट्रक चालकाने मी अगोदरच पावती फाडली आहे, त्यामुळे मी पावती फाडू शकत नाही असं म्हटलं. यामुळे राग आल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या जवळील काठीने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप जखमी ट्रक चालकाने केला आहे. यामुळे पोलिसांच्या विरोधात ट्रक आडवा लावून ट्रक ड्रायव्हरने रस्ता अडवला होता.

दरम्यान, आम्हाला महाराष्ट्रातून जायला 2500 रुपये लागतात. कारण प्रत्येक जिल्ह्यात आणि पॉईंटवर पोलिसांकडून पैसे घेतले जातात आणि त्या बदल्यात आम्हाला पास दिले जातात. असं म्हणत पोलिसांकडून दिलेल्या पासची पोलखोल ट्रक ड्रायव्हरने केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे महामार्गावर पोलिसांकडून होणारी लूट पाहता सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT