Beed Dharur Crime saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: बीड पुन्हा हादरलं! चार दिवसात जिल्ह्यात खुनाची तिसरी घटना, भरदिवसा व्यापाऱ्याला संपवलं

Beed Dharur Crime: भर रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे धारूरमध्ये खळबळ उडाली आहे.

विनोद जिरे

Trader Killed In Dharur: बीड जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून 40 वर्षीय सराफा व्यापाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या धारूरजवळ घडली आहे. नितीन मोहन धोत्रे (वय 40 वर्षे) असं खून झालेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसातील तिसरी ही खूनाची तिसरी घटना आहे. या तीन घटनांमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितीन धोत्रे यांचे धारूर शहरात सराफा दुकान आहे. मयत मोहन धोत्रे इतर काही जणांमध्ये काल सायंकाळी वाद झाले होते. या वादात नितीन धोत्रे यांची हत्या करण्यात आली. (Breaking News)

भर रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे धारूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली आहे. धारूर पोलिसांनी या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (Latest Political News)

दरम्यान मयत नितीन धोत्रे आणि आरोपींमध्ये नेमके भांडण कशामुळं झालं आणि आरोपींनी नेमकी हत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT