Beed Crime Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : सतीश भोसले उर्फ 'खोक्या'ची अख्खी कुंडली बाहेर, पोलीस उतरवणार माज

Beed Crime Satish Bhosale : सतीश भोसले याने ढाकणे बापलेकाला मारहाण केली होती. तो बीडचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान सतीश भोसलेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडमधल्या शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याचे समोर आले. हा सतीश भोसले भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय असल्याचे समोर आले आहे.

सतीश भोसले हा राजकारणात सक्रीय आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीशने महेश ढाकणे या तरुणाला बॅटने जबर मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. सतीशने ढाकणे याच्या वडील दिलीप ढाकणे यांना दात तुटेपर्यंत मारहाण केली होती.

दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या हा गुन्हेगारी विश्वात सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.

- २०२१ मध्ये कलम ३०७ अंतर्गत प्रयत्नात्मक खून (Attempt to Murder)

- २०२० मध्ये कलम ४९८ अ अंतर्गत कौटुंबिक गुन्हा (Family Crime)

- २०२० मध्ये कलम ३०४ अंतर्गत ठार मारण्याचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यू (Culpable Homicide Not Amounting to Murder)

- आर्मी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल आहे.

सतीश भोसलेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये तो कारमध्ये बसून नोटांची बंडलं फेकताना दिसत आहे. दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये सतीश हॅलिकॉप्टरमधून उतरताना दिसतो. माज दाखवणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेचा माज उतरवण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT