Santosh Deshmukh Case saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : हत्येनंतरही सरपंचासाठी डर्टी प्लॅन, देशमुखांसाठी बलात्काराचा कट? हत्येनंतरचा घटनाक्रम समोर

Santosh Deshmukh Case Update : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन आखल्याचा प्रकार समोर आलाय... मात्र हा प्लॅन कुणी आखला होता? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केल्यानंतर कराड गँग देशमुखांच्या बदनामीचा डर्टी प्लॅन आखला होता..देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेने आखल्याची माहिती गोपनीय साक्षीदाराने दिलीय... मात्र सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेने हा प्लॅन कसा आखला होता? पाहूयात...

सरपंचांसाठी डर्टी प्लॅन

- 8 डिसेंबर - बीडच्या नांदूर फाट्यावरील हॉटेलमध्ये विष्णू चाटेच्या वाढदिवशी पार्टी

- जेवताना विष्णू चाटेचे 6 डिसेंबरच्या वादावरून सुदर्शन घुलेला टोमणे

- आम्ही कमवायचं, तुम्ही गमवायचं; विष्णू चाटेनं घुलेला डिवचलं

- आपलं जीवन कुत्र्यासारखं झाल्याचं विष्णू चाटे सुदर्शन घुलेला म्हणाला

- तू तुझी इज्जत घालवली आणि आमचीही घालवल्याचं चाटेचं विधान

- सरपंचाला उचलून 376चा गुन्हा नोंदवतो, असं सुदर्शन घुले विष्णू चाटेला म्हणाला

- तुला काय करायचं ते कर, नाहीतर केजला जा असंही चाटे घुलेला म्हणाला

याआधीच विधानसभेत बोलताना सुरेश धसांनी कराड गँगच्या डर्टी प्लॅनचा उल्लेख केलाय...

एवढंच नाही तर हत्येनंतर पोलिसांनीच संतोष देशमुखांचा मृतदेह केजऐवजी कळंबकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कराड गँगचा हा डर्टी प्लॅन फसला... मात्र देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्लॅनमध्ये पोलिसांचाही सहभाग असेल तर पोलिसांना सहआरोपी केलं जाणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Bedroom Vastu Tips: बेडरूममध्ये आरसा ठेवावा की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

SCROLL FOR NEXT