Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime : विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी ५० हजारांची लाच; पोलीस उपनिरीक्षकांसह काँन्स्टेबल रंगेहाथ

विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी १० हजारांची लाच घेताना एका पोलिस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

विनोद जिरे

Beed Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लाचखोर सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आता या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. अशातच बीडमध्ये (Beed Crime) लाचलुचपत विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी १० हजारांची लाच घेताना एका पोलिस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (Latest Marathi News)

पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस (Police) कर्मचारी विकास यमगर अशी लाचखोरांची नावे आहेत. दोघेही बीड येथील शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक गायकवाड व अंमलदार यमगर यांनी तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी केली होती.

दरम्यान, तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रादाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने ही माहिती लाचलुचपत विभागाला दिली. पोलिसांनी सापळा रचत शहरातील बसस्थानकासमोरील उडपी हॉटेलात पैसे स्विकारताना दोघांनाही रंगेहाथ अटक केली. दरम्यान या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील एसीबीच्या पथकाने ही कारवाई केलीय. तर या कारवाईने बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT