Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News : लग्नाचं आमिष दाखवून २ वर्षे महिलेवर अत्याचार; बीडमधील खळबळजनक घटना

बीडमधून खळबळजनक घटना घडली आहे.

विनोद जिरे

Beed News : बीडमधून खळबळजनक घटना घडली आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत असलेल्या एका नर्स महिलेवर, लग्नाचे आमिष दाखवून सतत २ वर्षे अत्याचाराची केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये (Beed) 30 वर्षीय पिडीत विवाहित महिला ही एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. तिच्यासोबत त्याच रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या दादासाहेब तौर वय 23 याची व पीडितेचे ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. या दरम्यान युवकांने महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दोघेजण एकाच रूममध्ये राहू लागले.

या कालावधीत सतत तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती. मात्र, दादासाहेब हा लग्नास टाळाटाळ करू लागला. यामुळे पीडित महिलेने माजलगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दादासाहेब तौर याच्या विरोधात अत्याचार केल्याचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT