Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : व्हिडिओ व्हायरल का केला?, जाब विचारणाऱ्या मित्राचेच बोटे छाटली; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Beed News : बीड शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून यातच व्हिडीओ व्हायरल करण्याचे विचारल्यावरून थेट बोटे छाटण्याचा प्रकार घडला आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून टोकाची भूमिका घेतली जात आहे. यातच तरुणाला धमकावण्याचा व्हिडीओ केला. यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याचा जाब विचारण्यावरून थेट तरुणाची बोटे छाटण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये मागील काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशीच पुन्हा एक घटना घडली असून यात कोयता आणि सत्तुरने तरुणाला धमकावून व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या तरुणाने विचारला. हा राग मनात धरून तरुणाच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात घडला आहे. 

अज्ञात स्थळी नेत केली मारहाण 

तीन दिवसांपूर्वी शेख अलीम अनिस या तरुणाला चार जणांच्या टोळक्या कडून कोयता आणि सत्तुरने धमकावले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या घटनेतील मुख्य आरोपी मारहाण झालेल्या तरुणाचा मित्रच आहे. हा व्हिडिओ इतर मित्रांना का दाखवतो? याचा जाब अनिसने विचारला. त्याच्या मित्राने गाडीवर बसवून अज्ञातस्थळी नेत मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचे बोट छाटण्यात आले.

चार जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्या असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT