Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: प्रेमविवाह केल्याचा राग; गर्भवती सुनेसोबत सासऱ्याचे धक्‍कादायक कृत्‍य, पत्नीवरही केला प्राणघातक हल्ला

प्रेमविवाह केल्याचा राग; गर्भवती सुनेसोबत सासऱ्याचे धक्‍कादायक कृत्‍य, पत्नीवरही केला प्राणघातक हल्ला

विनोद जिरे

बीड : मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून गर्भवती सुनेवर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला. विशेष म्हणजे (Beed News) यादरम्यान स्वतःच्या पत्नीवरही आरोपीने प्राणघातक हल्ला केला होता. बालाजी लव्हारे (रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे आरोपीचे नाव आहे. त्‍यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. घरत यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (Breaking Marathi News)

बीडच्या अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यात असणाऱ्या पट्टीवडगाव येथे २०२० मध्‍ये सदरील घटना घडली होती. आरोपी बालाजी याच्या मुलाचा मयत शीतल हिच्यासोबत प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. याचा राग बालाजीच्या मनात होता. २७ ऑगस्ट २०२० रोजी शीतल तिच्या आईसोबत फोनवर बोलत असताना आरोपी सासरा बालाजी लव्हारे याने तिच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिचा खून केला. यावेळी शीतल सहा महिन्याची गर्भवती होती. या दरम्यान आरोपी बालाजीची पत्नी सुवर्णा या सुनेला सोडविण्यासाठी गेल्या असता बालाजीने त्यांच्याही पाठीत कुऱ्हाडीने दोन वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी मयत शीतलचे वडील किसन कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी लव्हारे याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुनावणीवेळी सरकारी पक्षाच्यावतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. घरत यांनी बालाजी लव्हारे यास दोषी ठरवून जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT