Beed Crime Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडचा बिहार झाला! तरुणाला बेदम मारहाण, आणखी एक धक्कादायक VIDEO व्हायरल

Beed Another Attack Video Goes Viral: बीडमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे वारंवार समोर येत आहे. एका तरुणाचा बेदम मारहाण करताचा व्हिडओ समोर आला आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चालली असून रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडापासून बीडमध्ये आतापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांच्या साडूने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता ज्या तरुणाला धनंजय देशमुखांच्या साडूने मारहाण केली होती त्या तरुणाने दुसऱ्या तरुणाला मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सततच्या या घटनामुळे बीडचा बिहार होत चालला असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ओमकार सातपुते या तरुणाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्येही अमानुष पद्धतीने तरुणाला मारहाण केली जात आहे. बेल्टचा वापर करून चार ते ५ जणांनी या तरुणाला मारहाण केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ओंकार सातपुतेला धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकरने मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता. ओंकार सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांचा चुलत भाऊ आहे. आता ओंकार सातपुतेने एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. संजय बावणे या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT