Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: पती अन् मुलाचं निधन, विधवा महिलेवर सलग तीन वर्षे अत्याचार; बीडमधील संतापजनक घटना

सलग तीन वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

विनोद जिरे

Beed News: महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता देखील बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. बीडमध्ये एका विधवा महिलेवर सलग तीन वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Latest Beed Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका विधवा महिलेला आयुष्यभर सांभाळण्याचे प्रलोभन दाखवत तिच्यावर सतत 3 वर्षे अत्याचार करण्यात आलाय. तसेच पीडितेकडून उसने घेतलेले 3 लाख रुपयेही बुडविल्याची माहिती देखील समोर आली आहे.

हा धक्कादायक प्रकार बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील एका गावात घडला आहे. याप्रकरणी बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये, आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला विधवा आहे. तसेच मोठ्या मुलाचाही अपघाती मृत्यू झालाय. याच मुलाचे 7 लाख रूपये या महिलेला मिळाले होते. ही बाब आरोपीला समजताच त्याने पीडित महिलेसोबत जवळीक साधली. तिला शेतात मजुरीचे काम मिळवून दिले.

त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करत अत्याचार केला. तसेच तिच्याकडून 3 लाख रूपयेही उसने घेतले. पैसे मागण्यास गेल्यावर आरोपीसह त्याच्या पत्नी व आईने पीडित महिलेला मारहाण केली असल्याचं फिर्यादीने म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी आता आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ भंगार गोदामाला भीषण आग

Janhvi Kapoor Video: 'आपल्यात क्लॅश होणार...' जान्हवी कपूर वरूण धवनला असं का म्हणाली?

Tamil Nadu politics: तमिळनाडूमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; थलापती विजय यांच्या TVK कडून सत्तास्थापनेच्या हालचाली, काँग्रेसनं नवा डाव टाकला

Mrunal Thakur: चांद तू नभातला...मृणालचं सौंदर्य पाहून व्हाल फिदा

IPL 2026: ठरलं तर! 'या' स्टेडियमवर रंगणार यंदाची फायनल; वाचा क्वालिफायरचे सामने कुठे खेळवणार?

SCROLL FOR NEXT