Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime News: सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद; भावानेच भावाला संपवलं

Beed Latest News: बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विनोद जिरे

Beed Crime News:

राज्यभर गणरायाच्या आगमनाने आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना दोन निर्घृण हत्यांनी बीड जिल्हा हादरून गेला आहे. बीड जिल्ह्यात जमिनीच्या वादातून सख्या भावाने भावाचा तर दारु पिऊन त्रास देत असल्याने मुलाने वडिलांचा केला खून केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या (Beed) तिप्पटवाडी येथे जमिनीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बळीराम ज्ञानदेव शेंडगे (वय 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत बळीराम शेंडगे हे त्यांच्या वडिलांची जमीन भावांना वाटून मागत होते.

मात्र त्यांचा भाऊ बबन ज्ञानदेव शेंडगे या वाटणी करण्यास टाळाटाळ करत होता. याच वादातून काही दिवसांपूर्वी दोघां भावांमध्ये किरकोळ वाद सुरू असताना बबन शेंडगे याने भाऊ बळीराम शेंडगे यांच्या डोक्यात धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात बळीराम शेंडगे गंभीर झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात होते, मात्र काल त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हत्येची दुसरी घटना ही बीडच्या माजलगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. तालुक्यातील दिंद्रुड येथे दारू पिऊन त्रास देत असल्याने मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मयत मुंजा एकनाथ कटारे (वय 52) यांना दारूचे व्यसन होते.

अनेक वेळा सांगूनही न ऐकल्याने मुलगा अशोक कटारे याने 16 सप्टेंबर रोजी जन्मदात्या वडिलांचा खून करून त्यांच्या तोंडाला पिशवी बांधून मृतदेह परभणीच्या इंद्रायणी नदीत फेकून दिला. मात्र परभणी पोलिसांनी या खुनाचा छडा लावत ही घटना उघडकीस आणली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासह दिंद्रुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT