Pune Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime News: नीट परीक्षेनं होत्याचं नव्हतं झालं; अपयश आलं अन् हसत्या खेळत्या मुलीनं मृत्यूला कवटाळलं

अपयश न पचल्याने एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.

विनोद जिरे

Beed News: काही दिवसांपूर्वीच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. तर काहींच्या पदरी अपयश आलं आहे. अशात हे अपयश न पचल्याने एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सदर दु:खद घटना बीडमध्ये घडली आहे. अभ्यास करूनही नीट परीक्षेत यश न आल्याने, नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या साबळा गावामध्ये उघडकीस आली आहे.

विद्यार्थीनी ही एमबीबीएससाठी मागील 2 वर्षांपासून नीट परिक्षेसाठी (Neet Exam) तयारी करत होती. तीने भरपूर परिश्रम घेऊन देखील तिला नीट परिक्षेत अपयश आले. नुकताच १३ जून रोजी नीट परिक्षेचा निकाल लागला त्यात तिला कमी मार्क आले म्हणून तिने जीवन संपविले आहे. दरम्यान या घटनेने साबळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

परीक्षा (Exam) म्हटल्यावर यश अपयश या दोन्ही गोष्टी आल्याच. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करुन परीक्षेला जातात आणि एका निकालावर त्यांचं पुढील भविष्य अवलंबून असतं. अशात वर्षभर अभ्यास केल्यानंतर अपयश आल्यास होणारा मानसिक त्रास प्रचंड असतो. विद्यार्थी यामुळे नैराश्यात जातात आणि टोकाचं पाऊल उचलतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये ईद मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

SCROLL FOR NEXT