Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

बीड हादरले! अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी मृत्यू, पतीने मुलासमोरच पेट्रोल टाकून पेटवले, मृत्यूपूर्वी महिलेचा धक्कादायक खुलासा

Beed Crime News : बीडमध्ये कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला पेटवल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या अंगणवाडी सेविकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे कौटुंबिक वादातून आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या अनुष्का शिरसाट या महिलेचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी नोंदवलेल्या जबाबात पत्नी अनुष्काने गंभीर आरोप केले आहेत.

मुलाच्या डोळ्यांदेखत घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शिरसाट या अंगणवाडी सेविका होत्या. त्यांचा पती मिलिंद शिरसाट हा त्यांच्यावर सतत चारित्र्याचा संशय घेऊन कौटुंबिक छळ करत होता. ७ ऑगस्ट रोजी आरोपीने अनुष्का यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. यावेळी त्यांचा लहान मुलगा "पप्पा मम्मीला मारू नका" म्हणून रडत विनवणी करत होता, तरीही नराधम पतीने मुलाच्या डोळ्यांदेखत पत्नीला पेटवून दिले. इतकेच नव्हे, तर अनुष्का यांचा अंगणवाडीचा पगारही पती स्वतःच्या खात्यावर घेत असल्याचे समोर आले आहे.

साहेब त्याला जन्मठेप द्या, मृत्यूपूर्वीचा जबाब

गंभीररीत्या भाजलेल्या अनुष्का यांनी ८ ऑगस्ट रोजी मृत्यूपूर्वी पोलिसांना जबाब दिला. त्या जबाबात पतीच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला. तो मला आणि मुलाला बेदम मारायचा. साहेब, त्याला जन्मठेप द्या! अशी आर्त मागणी अनुष्का यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांकडे केली.

घटनेनंतर फरार झालेल्या पती मिलिंद शिरसाट याला बीड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वडाळ्यातील निवडणूक कार्यालयावर मनसेची धडक

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

Aadi Anant Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील हळवा प्रवास; अशोक सराफ- संकर्षण कराडेचा 'आदि-अनंत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Papaya : रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर शरीरात काय बदल होतात?

CJP Protest: रांका, दास अन् शिंदे, CJP च्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अभिजीत दीपके आज दिल्लीत परत येणार

SCROLL FOR NEXT