Beed Crime x
महाराष्ट्र

Beed : बीड पुन्हा हादरलं! शिक्षिकेवर १६ वर्षे अत्याचार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा

Beed Crime : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून बीडमध्ये शिक्षिकेवर अत्याचार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पदाधिकाऱ्यावर शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून बीडमध्ये शिक्षिकेवर अत्याचार

  • पुण्यात फ्लॅट घेऊन देतो म्हणत एक कोटी रुपयांची फसवणूक

  • महिलेच्या तक्रारीनंतर पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल

Beed News : बीडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड शहरात राहणाऱ्या एका महिलेने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. पदाधिकाऱ्याने १६ वर्षांपासून अत्याचार केल्याचे महिलेने म्हटले आहे. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे.

मुलाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून १६ वर्ष अत्याचार केल्याचा आरोप महिलेने पदाधिकाऱ्यावर केला आहे. पैसे घेऊन फसवणूक केल्याचा उल्लेख देखील महिलेच्या तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांकडे गेलीस तर तुला मारुन टाकेन, माझी वरपर्यंत ओळख आहे, असे म्हणत त्याने धमकावल्याचेही महिलेने म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी नारायण याच्या विरोधात एका महिला शिक्षिकेने फसवणूकीचा आरोप केला आहे. 'तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो असे म्हणत नारायणने २००६ ते २०२२ अशा प्रकारे १६ वर्षे माझ्यावर अत्याचार केला. तुला पुण्यात फ्लॅट घेऊन देतो, असे म्हणत त्याने एक कोटी दहा लाख रुपये घेतले' असेही महिलेने म्हटले आहे.

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये नारायणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो बीडमधील नेकनूरच्या जिल्हा परिषदेतील माजी सदस्य आहे. याशिवाय नारायण हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचेही म्हटले जात आहे. प्रकरण मिटवण्यासाठी आमदार धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांनी मध्यस्थी केल्याचा दावाही केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT