Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: धक्कादायक! 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; बीड शहरात खळबळ

Beed News Update: बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला ही घटना घडली आहे.

विनोद जिरे

Beed Crime New: बीड शहरात एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Crime News In Marathi)

गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed Crime) जिल्ह्यात वारंवार गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच शहरात ३० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने (रा.आनंदवाडी, ता.जि.बीड) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM - 7094) या क्रमांकाची दुचाकीही सापडली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. नेमकी तरुणाची हत्या कोणी केली ? हत्येचे कारण काय ? याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत. शहरापासून काही अंतरावर ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

१० वीत शिकणाऱ्या मुलाने संपवले आयुष्य..

अकोला (Akola) शहरातल्या खडकी येथे आईवडील, बहिणीसोबत राहणाऱ्या आणि दहावीत शिकणाऱ्या मुलाने घरात कोणी नसल्याची संधी साधून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. आकाश सुदेश निकोजे असे मुलाचे नाव असून या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. खदान पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT