Beed Accident News Saam TV
महाराष्ट्र

Beed Accident News: विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू

Car and Tractor Accident: कारने जात असताना मैदा फाट्याजवळ पोहचताच त्यांच्या कारची आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. अपघातात कारने प्रवास करणाऱ्या अन्य तीन व्यक्ती गंभीर जखमी आहेत.

Ruchika Jadhav

Beed News:

बीडमध्ये भरधाव ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात आईसह मुलगा ठार झाला असून अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. बीड परळी महामार्गावरील मैदा फाट्याजवळ हा भीषण अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रत्नमाला केशव पवार (वय ४१) प्रदीप केशव पवार (वय २४) अशी मृत मायलेकांची नावं आहेत. हे दोघेही उपळी ता.वडवणी येथील रहिवासी होते. कारने जात असताना मैदा फाट्याजवळ पोहचताच त्यांच्या कारची आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. अपघातात कारने प्रवास करणाऱ्या अन्य तीन व्यक्ती गंभीर जखमी आहेत.

अपघातात जखमी व्यक्तीपैकी एकाने विषारी औषध घेतलं होतं. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी हे सर्वजण कारने बीड जिल्हा रुग्णालयाकडे निघाले होते. मात्र वाटेतच मोठा अनर्थ झाला. कारचा अपघात झाल्याने माय लेकाचा मृत्यू झाला. मात्र ज्याने औषध प्राशन केलं त्याच्यासह अन्य दोघे जखमी आहेत.

नितीन सुभाष वेताळ, अनुसया सुभाष वेताळ, प्रमोद देविदास चव्हाण अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण आहे की, ट्रॅक्टरचे हेड तुटून दोन तुकडे झालेत. तर कारचा देखील चक्काचूर होऊन कार रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पडली. जखमींवर बीड येथे दवाखान्यात उपचार सुरू असून या घटनेने उपळी गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT