Beed Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed: बीड हादरले! अडीच वर्षांच्या मुलीवर आत्येभावाकडून बलात्कार, अश्लील व्हिडीओ पाहून भयंकर कृत्य; चिमुकलीचा मृत्यू

Beed Crime News : बीडमध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. १५ वर्षांच्या आत्येभावानेच हे भयंकर कृत्य केले. अश्लील व्हिडीओ पाहून त्याने चिमुकलीवर बलात्कार केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary -

  • अंबाजोगाईमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमागे गंभीर गुन्हा उघड

  • शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

  • आत्येभावाने चिमुकलीवर बलात्कार केल्याचे उघड

  • अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • घटनेमुळे परिसरात संतापाची लाट

योगेश काशिद, बीड

बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चिमुकलीचा १७ मार्च २०२६ रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा केवळ अपघात वाटत असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या माहिती गोळा केली. पीडितेच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी असलेला तिच्या आत्याचा १५ वर्षीय मुलगा ३ दिवस जेवला नव्हता आणि सतत रडत होता, अशी माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या संशयावरून पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेच्या मृत्यूपूर्वी आठ दिवस अगोदर आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेले आणि घरात कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील व्हिडीओ पाहून तिच्यावर अत्याचार केले. त्यापूर्वी देखील त्याने तिच्यावर एकदा अत्याचार केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम २०१२ च्या कलम ४, ६, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांच्याकडे सोपवण्यात आला असून. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT